साहित्य, नाटक, चित्रपट याच क्षेत्रांत कला आहे, या समजातून आपण बाहेर आलं पाहिजे. माणसाच्या जगण्यातलं जगातलं प्रत्येक क्षेत्र हे कला आहे, या दृष्टीला जावं लागेल
लाकडं कापणं, शेती करणं, मजुरी करणं, स्वयंपाक करणं, घर बांधणं, स्वच्छता करणं, दारू तयार करणं, जेवणं, कारखान्यात काम करणं, कारकुनी करणं, कपडे शिवणं, गप्पा मारणं, अशा जगण्यातल्या सर्व कृती या कलाच आहेत. आणि जगातला प्रत्येक माणूस आपल्या जगण्याच्या कलेत रमलेला असतो. त्यात तो आयुष्य घालवत राहतो. साहित्य, नाटक, चित्रपट या परोपजीवी कला आहेत आणि मुळात या कलांचा मूळ उपयोग लोकांचं मनोरंजन हाच आहे.......